My voice is shaking at lower notes while singing - #23358
आध्यात्मिक मार्गात अडथळे का येतात? आजकाल अनेक जण म्हणताना दिसतात, “देवाची उपासना सुरू केली आणि उलट त्रास वाढले… म्हणून आता फारसा देव-धर्म करत नाही.” हे वाक्य अनेकदा आपण ऐकतो, पण या मागचं खरं कारण फार कमी लोकांना माहीत असतं. माणूस साधारणपणे अडचणींमध्ये, संकटांमध्ये असताना देवाची आठवण काढतो. तेव्हा तो जप, ध्यान, व्रत, सेवा सुरू करतो. पण आश्चर्य म्हणजे, याच वेळी त्याच्या आयुष्यात काही विचित्र घटना घडायला लागतात — घरात वाद-विवाद होतात, गैरसमज वाढतात, शरीर अस्वस्थ होतं, कामांमध्ये अडथळे येतात, व्यवसायात अडचणी वाढतात. आणि मग माणूस गोंधळतो, निराश होतो, आणि उपासना थांबवतो. इथेच आपण चुकतो! खरंतर, उपासना सुरू होताच आपल्या आत वर्षानुवर्षे साठलेली नकारात्मक ऊर्जा अस्वस्थ व्हायला लागते. ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात नाही. कारण ती आपल्या मनावर, शरीरावर आणि कर्मांवर आपली पकड घट्ट बसवून ठेवते. आध्यात्मिक साधना, मंत्रस्मरण, जप-तप यामध्ये इतकी ताकद असते की ही नकारात्मक शक्ती हळूहळू वितळायला लागते, बाहेर पडायला लागते. पण ती सहजपणे जात नाही; ती प्रतिकार करते, त्रास देते. याच काळात आपण अधिक सावध, धैर्यशील राहिलं पाहिजे. जेव्हा आपण हार न मानता उपासना चालू ठेवतो, तेव्हा हे अंधाराचे थर गळून पडतात. मग आयुष्यात नवीन प्रकाश येतो, इच्छा पूर्ण व्हायला लागतात, पूर्वकर्मांचा निचरा होतो, पुण्यसंचय सुरू होतो — आणि हेच पुण्य संकटाच्या काळात आपली ढाल बनतं. त्यामुळे, संकटं आली, अडचणी वाढल्या तरी उपासना सोडू नका. कारण तीच खरी परीक्षा असते. म्हणुन श्री दत्तात्रय महाराज म्हणतात — “एकदा माझ्या छायेखाली आलो की भीती नाही.” आध्यात्मिक मार्ग हा काटेरी असतो, पण त्याच्यातून चाललात तर शेवटी फुलांचा सडा मिळतो. 🙏🏻🌹सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻
100% Anonymous
completely confidential.
No sign-up needed.

Doctors’ responses

100% Anonymous
600+ certified Ayurvedic experts. No sign-up.
About our doctors
Only qualified ayurvedic doctors who have confirmed the availability of medical education and other certificates of medical practice consult on our service. You can check the qualification confirmation in the doctor's profile.